कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सोन्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. सर्व सामान्याच्या आवाक्याबाहेर सोने गेले आहे. विवाह, बारसे वा अशा कार्यक्रमासाठी सोने लागतेच. लाखाहून जास्त दर असलेले सोने खरेदी कसे करायचे. परवडेल कसे. हे प्रश्न निर्माण होतात. २२ कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव आता लाखाच्या घरात आहे. यामुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्याना फार कठीण झाले आहे. यावर भारतीय मानक ब्युरोने पर्याय काढला आहे.
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशावेळी ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नाही म्हटलं तरी लग्नसमारंभाच्या कार्यात सोन्याचे दागिने देण्याची प्रथा आहे. त्यामुळं हल्ली ग्राहकांचा कल कमी कॅरेट असलेल्या स्वस्त दागिन्यांकडे वाढतोय. त्याचमुळं भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस)ने आता नऊ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची अधिकृत मान्यता दिली आहे.
ग्राहकांना आता ९ कॅरेट सोन्याचे दागिनेही खरेदी करता येणार आहे. नऊ कॅरेट सोन्याचे दागिने अधिकृतरित्या प्रमाणित केले जाणार आहेत. वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक परवडणारे पर्याय उपलब्ध होणार आहेत. अनेकजण सोनं घ्यायचं म्हटलं की 22 किंवा 23 कॅरेटचे दागिने घेतात. मात्र हल्ली दर वाढल्याने 18 कॅरेट सोन्याचे दागिनेही घेतात.
गेल्या काही वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी लोक २२ कॅरेटनंतर १८ कॅरेट १४ कॅरेटला देखील पसंती देत आहेत. त्याचबरोबर आता नऊ कॅरेट दागिन्यांचाही ट्रेंड वाढत आहे. बीएसआय दुरुस्ती क्रमांक २नुसार, जुलै पासून ९ कॅरेट सोने अनिवार्य हॉलमार्किंग योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
नऊ कॅरेटचा पर्याय ग्राहकांसाठी किफायतशीर आणि परवडणारा आहे. तसंच, बजेट फ्रेंडलीदेखील आहे. हॉल मार्किंगमुळं कॅरेट काहीही असले तरी ग्राहकांना सोन्याची शुद्धता हमीसह कळणार आहे. परवडणारी किंमत आणि सोनं यामुळं ९ कॅरेट सोन्याची मागणी वाढते आहे.
९ कॅरेटमध्ये ज्यामध्ये ३७.५ टक्के शुद्ध सोने असते आणि उर्वरित चांदी आणि तांबे यांचे मिश्रण असते. उदा. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १ लाख रुपये असेल, तर ९ कॅरेटची किंमत प्रति ग्रॅम सुमारे ३,७५० ते ३,८०० रुपये असेल.
————————————————————————————————