मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘नो पीयूसी… नो फ्युएल’ ( No PUC… No Fuel ) हा उपक्रम कठोरपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणी कशी होणार ?
परिवहन विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी खालील पद्धती ठरविल्या आहेत
-
सीसीटीव्ही स्कॅनिंग : प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा क्रमांक स्कॅन केला जाईल.
-
पीयूसी तपासणी : स्कॅन केलेल्या क्रमांकावरून त्या वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र वैध आहे की नाही, हे तपासले जाईल.
-
इंधन नाही : पीयूसी प्रमाणपत्र वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
-
जागेवरच पीयूसीची सोय : वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी, त्याच पेट्रोल पंपावर तात्काळ पीयूसी प्रमाणपत्र काढून देण्याची व्यवस्था केली जाईल.
-
युनिक आयडी : प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला एक युनिक आयडेंटिटी (UID) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता वेळोवेळी तपासता येईल.