मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राज्यातील सर्व ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार असून, प्रत्येक उद्यानासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना “वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजना” अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करताना सांगितले की, “ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने ही भेट दिली आहे. या उपक्रमातून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक सुविधा निर्माण होतील. ही योजना शहरांमध्ये आधुनिक, आरोग्यवर्धक आणि पर्यावरणपूरक जागा निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..”
योजनेचे तपशील
-
राज्यातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित केले जाणार.
-
प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर.
-
उद्यानांमध्ये खेळण्याची साधने, व्यायाम क्षेत्र, सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक सुविधा यांचा समावेश.