शाश्वत सेंद्रिय शेतीकडे वाटचाल : गुडाळ येथे उद्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

0
252
Organic Farming under Dr. Punjabrao Deshmukh
Google search engine

राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 2025-26” अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजता गुडाळ येथील गुडाळेश्वर मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच कार्यक्रमास नगर विकास, परिवहन, समाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, आमदार व स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शांती कुमार पाटील (तज्ञ मार्गदर्शक)व ऋतुराज चव्हाण सहाय्यक प्रद्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी जागरूक करण्यासोबतच उत्पादन खर्चात बचत, पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व, तसेच निरोगी अन्ननिर्मितीकडे वाटचाल करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प संचालक आत्मा रक्षा शिंदे, सहाय्य्क तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे व संग्राम पाटील गुडाळकर हे परिश्रम घेत आहेत. शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संग्राम पाटील चेअरमन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here