कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यांत पावसानं जोर धरल्यामुळे हातातल्या बियाण्यांना उशीर न करता मातीत सोडलं जातंय. परिणामी, काही ठिकाणी अधून मधून येणाऱ्या पावसामुळे रानांतून पाणी साचून राहिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या बेभरवशामुळे शेतकरी हिशोबानं पेरणी करत आहेत. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासह सर्वच भागांत पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. सध्या राज्यात ११ लाख ७० हजार हेक्टरवर पेरण्या पार पडल्या असून, हे प्रमाण सुमारे ८ टक्के झाले आहे. अजून काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यास पेरणी हंगाम साधला जावू शकतो.
कोणत्या विभागात किती पेरण्या ?
विभाग | पेरणीचं टक्केवारीत प्रमाण |
---|---|
पुणे | २० टक्के – सर्वात आघाडीवर |
कोल्हापूर | १५ टक्के |
लातूर | १२ टक्के |
नाशिक | १२ टक्के |
औरंगाबाद | ९ टक्के |
विदर्भ व कोकण | अजून पावसाची वाट पाहतोय |
महाराष्ट्रातील विभागनिहाय होत असलेल्या पेरण्या-
-
सोयाबीन, तूर – मराठवाडा, विदर्भात जोरात
-
कापूस – यवतमाळ, अकोला, अमरावतीत मुख्यत्वे
-
मुग, उडीद – कोरडवाहू भागात सुरू
-
भात – कोकणात अजून पावसाची प्रतीक्षा
-
भात, मका, ज्वारी, बाजरी – पश्चिम महाराष्ट्रात सुरूवात
हवामान खात्याचा अंदाज काय सांगतोय ?
-
येत्या ४–५ दिवसांत मान्सून आणखी ताकदवान होणार
-
कोकण, मराठवाडा आणि बाकी उरलेल्या भागातही पाऊस पडणार
-
जुलैच्या सुरुवातीला ७० टक्क्यांवर पेरण्या होण्याची शक्यता
शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला :
-
उशीर न करता योग्य पीक निवडावं
-
खतांचं वेळेवर नियोजन करावं
-
तण नियंत्रण व किडसाठी उपाययोजना सुरु ठेवावी
-
शासकीय योजना, अनुदानासाठी कृषी सहाय्यकांशी संपर्कात राहावं
मान्सूनची चाल आता बऱ्यापैकी पकडलीये. पुणे, कोल्हापूर, नाशिक भागानं धाव घेतलीय, बाकी काही जिल्ह्यांत अजूनही आभाळाकडं नजर लागलीये. पाऊस जर असा टिकून राहिला, तर यंदाचा खरीप भरघोस आणि दिलासा देणारा ठरू शकतो, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.
—————————————————————————————-