spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeसामाजिकपुरुषांचा छळ, कौटुंबिक हिंसाचार : एक दुर्लक्षित वास्तव

पुरुषांचा छळ, कौटुंबिक हिंसाचार : एक दुर्लक्षित वास्तव

विकसित देशामध्ये पुरुष हिंसाचार म्हणजे पुरुषांविरुद्ध होणारा मानसिक, शारिरिक व आर्थिक अत्याचार यामध्ये कौटुंबिक हिंसाचार तसेच कामाच्या ठिकाणी होणारा हिंसाचार, छळ आणि समाजात होणारा अन्याय यांचा समावेश होतो. पुरुषांवर होणाऱ्या हिंसाचाराची कारणे अनेक आहेत. सामाजिक व पुरुषप्रधान संस्कृती व त्याबद्दल चुकीच्या समजुती तसेच पुरुष हिंसाचाराचे वेगवेगळे स्वरूप यामध्ये पुरुषाला मारहाण करणे, धक्काबुक्की तसेच शारिरिक जखम करणे इत्यादी येते.

मानसिक हिंसाचारचे स्वरुप हे शिवीगाळ करणे किंवा सार्वननिक ठिकाणी अपमान करणे, एखादया गोष्टीची अतिशय भीती दाखविणे आणि आर्थिक हिंसाचारा मध्ये ही छळ सुरु असतो. पैसे, संपत्ती वापरून एखाद्याला दडपण आणणे, दबाव आणणे. या सगळ्या हिंसाचाराचा पुरुषावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यांना शारिरिक दुखापत किंवा आजारपण येऊ शकते. मानसिक दृष्ट्या, भिती, निराशा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या सगळ्या मुळे पुरुषाच्या कामावर परिणाम होऊ लागतो. त्यातून त्याला निराशाजनक वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात येऊ शकतात अगदी मग ते स्वतः आत्महत्या करण्यापर्यंत जाऊन पोहोचतो
पुरुषांच्या तुलनेत सुमारे २० टक्के पुरुष है कौटुंबिक हिंसाचार ग्रस्त आहेत. पुरुषा विरोधात आपल्या भारतात सध्या काय परिस्थिती सुरु निर्माण झालीय. हिंसाचार संदर्भात आपण सांगण सोपे नाही, कारण पुरुष ही हिंसाचार ग्रस्त असू शकतात, पण काही लोक हे मान्य करीत नाहीत. या बाबतीत अनेक अधिकारी वर्ग हा दुसऱ्या अधिकारी वर्गावर हिंसाचाराचे संरक्षण करू शकतात. यामध्ये सर्वांच्या जीवनाचे आणि सन्मानाचे संरक्षण व्हावे अशी अपेक्षा न्यायव्यवस्थेकडे केली जावी.
अनेक देशामध्ये महिलांप्रमाणे कौटुंबिक हिंसाचारात पुरुषांनाही हिंसाचारापासून संरक्षण देतात. पण या विषयी पुरुष स्वतः हिंसाचारापासून पिडीत असेल तर त्याचा स्वीकार ही करतात. अनेक ठिकाणी अनेक पुरुष स्वतः हिंसाचाराचे बळी ठरू शकत नाहीत असे अनेकांची धारणा असते. असा तर्क ही केला जातो महिलांपेक्षा पुरुष अधिक बलशाही असतात. पण तरी अनेकांना प्रश्न पडतो की, महिला कसे काय पुरुषांवर अत्याचार करू शकतील. अनेक ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारामध्ये  महिलां हिंसाचाराच्या तुलनेत पुरुष हिंसाचाराचे प्रमाण ८० टक्के असते,  ही पुरुषांची तक्रार असते. काही Office for nationel statustics’ आकडेवारी नुसार वरून कळते की, अमेरिकेत घरगुती गैर वर्तनाचा बळी ठरलेल्या तीन पुरुषांमधील एक पिडित ठरतो. तर जर्मनीत दरवर्षी सुमारे २० टक्के पुरुषांची नावे कौटुंबिक हिंसाचार ग्रस्त मध्ये येतात.
भारतात मागील काही महिन्यामध्ये पुरुषांचा होणारा छळ आणि त्यामुळे पुरुषांनी संपवलेले जीवन अशा अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व हिंसाचार प्रकरणामुळे अनेक प्रसार माध्यमांवर वारंवार चर्चा सुरु असते. यामुळे पुरुषांवर होणाऱ्या छळाला वाचा फोडण्याची मागणी होऊ  लागली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी काही ठोस कायदे अस्तित्वात आहेत. त्या मानाने पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदे मोजकेच आहेत.
भारतात इतर काही छळ/हिंसाचार कायद्या बद्दल चर्चा महिलांच्या संरक्षणासाठी असले तरी त्यामानाने पुरुषांच्या छळ होणे या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्त्री पुरुष समानता असली तरी पुरुषां साठी कायदे मोजकेच आहेत. त्यापैकी जर कामाच्या ठिकाणी छळाचा सामना करणाऱ्या पुरुषांसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम ४४९ बदनामी आणि कलम ५०३ धमकी किंवा गुन्हेगार अंतर्गत खटला दाखल करु शकतात. काही ठिकाणी सायबर छळाचे पुरुष देखिल बळी ठरतात. ज्यामध्ये पुरुषाची बदनामी, सायबर धमकी यांच्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मध्ये कलम ६६-अ आक्षेपार्ह संदेश पाठविल्याबद्दल तर कलम ६७-अ हे आश्लिल सामग्री प्रकाशित केल्या बदल शिक्षेची तरतूद आहे.
एखाद्या पुरुषावर खोटा आरोप आणि कायद्याचा गैरवापर ही सर्वात महत्वाची बाब म्हणजे कलम ४९८-अ हुंडा बळी कायदा आणि बलात्कार कायदे कलम ३७५ व ३७६ यासारखे संरक्षणात्मक कायद्याचा गैरवापर, खोटे आरोप राेखण्यासाठी मार्गदर्शन तत्वे केली आहेत. खाेट्या आरोपामुळे पुरुषांच्या मनावर -गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये सामायिक बहिष्कार, नोकरी गमावणे आणि मानसिक आघात याचा समावेश आहे. यामुळे काही पुरुषांनी आत्महत्या केली आहे. अनेकदा पुरुष अत्याचाराची तक्रार करण्यास कचरतात, त्यांना लाज वाटते, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवण्यास तयार नसते ही भिती त्यांना असते या सर्व गोष्टीमुळे पुरुष अत्याचारचे बळी पडतात.
अत्याचारापासून पुरुष स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि गैरवापर थांबविण्यासाठी पहिल म्हणजे मदत करणे, तुम्ही कुटुंबाशी, मित्रांशी विश्वास असलेल्या जवळच्या व्यक्तीशी बोला. जर तुमच्याशी गैरवर्तन करणाऱ्या जोडीदाराशी वागताना शक्य असल्यास त्या ठिकाणापासून निघूण जाणे, काही हिंसक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतील यासाठी जागरूक गरजेचे आहे. आणि त्यासाठी कायद्याची मदत घ्यावी.
महत्त्वाचे न्यायालयीन दाखले

भारताच्या विविध न्यायालयांनी  ४९८ अ व अन्य कायद्यांच्या गैरवापराच्या प्रकरणांवर महत्त्वाचे निर्णय दिले आहेत

  • राजेश शर्मा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य (२०१७) – सर्वोच्च न्यायालयाने कलम ४९८ अ चा गैरवापर रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

  • विवेक सुब्बा राव विरुद्ध हरियाणा राज्य – हुंडा कायद्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट केले.

  • के. के. घोष विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य (२०२५) – कामाच्या ठिकाणी पुरुषावर झालेल्या मानसिक छळावर न्यायालयीन निर्णय.

पुरुषही अत्याचाराचे बळी ठरू शकतात हे वास्तव समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे. कायदे फक्त महिलांचं नव्हे, तर सर्वांच्या रक्षणासाठी असावेत. समानतेच्या नावाखाली एक गट दुर्लक्षित राहतो, हे दुर्भाग्य आहे.

  – वैशाली ईश्वरराव माळी,  मो.नं. ९८५२०४१९४६

———————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments