चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
आपला सात-बारा दस्तऐवज आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळेल, ज्यामुळे भविष्यातील सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक योजने’ अंतर्गत आपला सात-बारा लिंक करावे, असे आवाहन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.
ही प्रक्रिया २५ मेपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे; अन्यथा शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळणार नाही. जर कोणतीही अडचण असल्यास गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.



