spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeसामाजिकशाहू महाराजांच्या विचारांनी कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करूया : पालकमंत्री

शाहू महाराजांच्या विचारांनी कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करूया : पालकमंत्री

सर्वांनी एकत्रित येत चांगले काम करूया : खासदार शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कोल्हापूरचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान व प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करत, त्यांच्या विचारांची व कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव अधिक उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर – देशाला दिशा देणारे काम त्यांनी केले असून, त्यांच्या जन्मस्थळाबाबत अजून जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी सर्व मिळून कर्तव्याची व भूमिकेची जबाबदारी घेऊन करू. या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे. यापुढेही आम्ही सर्वजण मिळून जन्मस्थळ विकासासाठी कार्य करू. येत्या काळात अधिवेशन झाल्यावर एक बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन कामांची दिशा ठरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याचे सांगून, रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी जोखून काम केले, असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची पालखी वाहतो, अशा शब्दांत गौरवोद्गार काढत त्यांनी अभिवादन केले.
खासदार शाहू महाराज छत्रपती – शाहू महाराज जन्मस्थळ आणि परिसराची कामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत; मात्र त्यांना अजून गती यावी. सर्वांनी एकत्रित येत चांगले काम करूया. 
शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी आलेल्या मान्यवरांसह त्या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मुळीक यांनी त्या ठिकाणची जमीन, जन्मस्थळ विकास व जिल्ह्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख्यांबाबत विविध विषय मांडले. शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मान्यवरांना व उपस्थितांना पुष्प दिले आणि शाहू महाराजांना विविध घोषणा देऊन जयंतीनिमित्त अभिवादनही केले.

उपस्थिती- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

—————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments