पन्हाळा : प्रतिनिधी
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील श्रावण षष्ठी यात्रा सुरळीत पार पाढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याच्या सूचना पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जोतिबा डोंगरावर ३० जुलै रोजी श्रावण षष्ठी यात्रा होणार आहे, यात्रेच्या नियोजना संदर्भात आज चौथी आढावा बैठक घेण्यात आली.
जोतिबा डोंगरावर ३० जुलै रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होते. आज जोतिबा डोंगर येथील पोलीस चौकीत पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली चौथी आढावा बैठक संपन्न झाली. चैत्र यात्रेनंतर ही सर्वात मोठी यात्रा भरत असते.
चैत्र यात्रे प्रमाणे श्रावण षष्ठी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होतात, अंदाजे तीन ते चार लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्ठिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत यात्रे पूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्याचे आदेश दिले, धोकादायक कठड्यांना रेलिंग बसविणे, स्वच्छतागृहाची संख्या वाढविणे, दर्शन मंडप, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, मंदिरात मॅटिंग टाकणेच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या पावसाळयांचे दिवस असलेने अपघात दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर बैठकीत वहातूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा झाली. घाट मार्गत दाट धुके आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना राबविण्यास सांगण्यात आल्या.विद्युत यंत्रणा दुरुस्ती, संरक्षक कठडे , साईड पट्ट्या मजबूती करणे, दुभाजक पट्टे मारणे, सूचना फलक लावणे आदी कामा संदर्भात सूचना दिल्या. यात्रा सुरळीत पार पाढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी बैठकी दरम्यान दिल्या.
उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे
प्रशासनाच्या विविध विभागीय अधिकारी,जोतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधाची माहीती दिली. २० जुलै पर्यंत सर्व तयारी होईल या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उपस्थिती : पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे, पन्हाळा- शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधीकारी विठ्ठल भोगम, जोतिबा देवस्थान समितीचे व्यावस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, के. ए. उपाध्ये यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते .
——————————————————————————————–