न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

0
90
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

न्या. भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभले आहेत. गवई हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत. तसेच ते पहिले बौद्ध सरन्यायाधीश असल्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या व्यापक आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून त्यांची नियुक्ती महत्वाची ठरत आहे. वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीश पदावर रुजू होत आहेत.

राष्ट्रपती भवनात बी आर गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बी आर गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संविधानाच्या कलम १२४(२) अंतर्गत गवईंचे नियुक्तीपत्रक काढण्यात आले, ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब करत त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

गवई हे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या, निवडणूक रोखे रद्द करणाऱ्या आणि २०१६ च्या नोटाबंदीच्या उपक्रमाची वैधता असलेल्या मोठ्या घटनापीठांचे ते भाग राहिले आहेत. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते मनीष सिसोदिया यांना जामीन देणे, ‘मोदी’ आडनावाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देणे आणि २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणात नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर करणे, अशा अनेक हाय-प्रोफाइल निर्णयांत देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here