‘ब्लॅकआऊट’ ही युद्धनिती कालबाह्य? …

0
316
Google search engine

प्रसारमाध्यम : अमोल शिंगे

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दशदवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगातून संताप व्यक्त करण्यात आला. यातच पाकिस्तान स्थित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तैयबाच्या शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आणि भारत पाक पाक वादाची ठिणगी पडली. यानंतर जवळजवळ युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या शक्यतांचा आधार घेऊन माध्यमांमधून आणि लोकांमधून ‘ब्लॅकआऊट’ ची चर्चा सुरु झाली. आज आपण ‘ब्लॅकआऊट’ या दुसऱ्या महायुद्धाच्या म्हणजेच सन १९३९ ते १९४५ या काळातील संकल्पनेचा वर्तमान काळातील ‘थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी’च्या काळात खरंच उपयोग होऊ शकतो का? समाज माध्यमांवर सुरु असणारा ‘ब्लॅकआऊट’ चा गवगवा योग्य आहे का ते आज आपण पाहणार आहोत.

सर्वात पहिल्यांदा आपण ‘ब्लॅकआऊट’ विषयी जाणून घेऊ..

‘ब्लॅकआऊट’ म्हणजे काय?

ब्लॅकआऊट’ म्हणजे रात्रीच्या वेळी संपूर्ण शहरातील कृत्रिम प्रकाश बंद ठेवणे, जेणेकरून शत्रूच्या विमानांना जमिनीवरच्या लक्ष्यांची ओळख करता येऊ नये. ‘ब्लॅकआऊट’ ही संकल्पना मुख्यतः ब्रिटन आणि युरोपमधील इतर देशांमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान (१९३९–१९४५) वापरली गेली. दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या अगोदरच. नाझी जर्मनीच्या बॉम्बहल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इंग्लंडमध्ये हे नियम काटेकोरपणे पाळले गेले होते. संपूर्ण युरोप, विशेषतः फ्रान्स, जर्मनी, पोलंड, आणि रशिया या देशांमध्येही ब्लॅकआऊटचे प्रकार दिसले.

इतिहासातील काही प्रमुख ब्लॅकआउट्स खालीलप्रमाणे आहेत:

• १९६५: ९ नोव्हेंबर रोजी, न्यू यॉर्क राज्य, आसपासचे सात राज्ये आणि कॅनडातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला. या ब्लॅकआउटमुळे सुमारे ३० दशलक्ष लोक प्रभावित झाले.

• २००३: १४ ऑगस्ट रोजी, उत्तर-पूर्व अमेरिका आणि कॅनडातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे सुमारे ५० दशलक्ष लोक प्रभावित झाले.

• २०२५: २८ एप्रिल रोजी, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये युरोपातील सर्वात मोठा ब्लॅकआउट झाला, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक, दळणवळण प्रणाली, रुग्णालये आणि बँकिंग सेवा प्रभावित झाल्या

भारता संदर्भात ३० आणि ३१ जुलै २०१२ रोजी देशाच्या उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे सुमारे ६० कोटी लोक प्रभावित झाले. ही घटना जगातील सर्वात मोठ्या ब्लॅकआउट्सपैकी एक मानली जाते.

थोडक्यात सांगायचं झालं तर ‘ब्लॅकआऊट’ चा वापर युद्धकाळात शत्रूंच्या विमानाला अंधारात जमिनीवरील काही दिसू नये आणि त्यांच्या हल्ल्यातून बचाव व्हावा यासाठी केला जातो. सन १९४५ ते २०२५ या काळात तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाने बऱ्याच अद्यावत आशा साधनांची निर्मिती केल्या आहेत. अशीच ‘ब्लॅकआऊट’ या संकल्पनेला मात देण्यासाठी ‘थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी’ची निर्मिती केली आहे. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ‘ब्लॅकआऊट’ मध्येसुद्धा जमिनीवरील स्थळांचा आणि वस्तूंचा वेध घेता येतो. ही ‘थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी’ काय आहे ते पाहू..

थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी म्हणजे अशी एक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी उष्णतेच्या (तापमानाच्या) आधारे वस्तू, प्राणी किंवा माणसं शोधते आणि त्यांचे दृश्य रूपांतरण करते. ही तंत्रज्ञान प्रणाली इन्फ्रारेड (infrared) किरणांचा वापर करून काम करते.

थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी कशी काम करते?

प्रत्येक वस्तू (सजीव असो वा निर्जीव) काही प्रमाणात उष्णता उत्सर्जित करते. ही उष्णता इन्फ्रारेड किरणे म्हणून बाहेर पडते, जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. थर्मल कॅमेरा या किरणांना टिपतो आणि उष्णतेच्या पातळीप्रमाणे विविध रंगांत प्रतिमा तयार करतो..

उदा: गरम वस्तू पांढऱ्या किंवा लाल रंगात दिसतात, तर थंड वस्तू काळ्या किंवा निळ्या रंगात दिसतात.

वापराचे क्षेत्र:

लष्करी व पोलिस तपासणी:  अंधारात किंवा धूरात शत्रू शोधण्यासाठी.

रेस्क्यू ऑपरेशन्स:  आपत्तीमध्ये अडकलेल्यांचा मागोवा घेण्यासाठी.

इलेक्ट्रिकल तपासणी:  वायरिंगमधील उष्णतेच्या गडबडी शोधण्यासाठी.

वैद्यकीय क्षेत्र:  तापमानातील फरक तपासून शरीरातील समस्या ओळखण्यासाठी. 

अमेरिकेच्या नेव्ही सील्सने ओसामा बिन लादेनवर केलेल्या हल्ल्यात थर्मल व्हिजनचा वापर केला होता.

फायदे:

अंधारात सुद्धा स्पष्ट दृष्य मिळते. धूर, धुके किंवा अडथळ्यांमधून सुद्धा निरीक्षण करता येते. मानवी डोळ्यांनी न दिसणारी उष्णता शोधता येते.

आता ‘ब्लॅकआऊट’ आणि ‘थर्मल व्हिजन टेक्नॉलॉजी’ यांची तुलना केली की ‘ब्लॅकआऊट’ ही संकल्पना कालबाह्य झाल्याची दिसून येते. ब्लॅकआऊटऐवजी आज उष्णतेच्या सिग्नेचरला लपवणारी सामग्री (जसे थर्मल-कॅमो फ्लाज), इलेक्ट्रॉनिक जॅमिंग, GPS स्पूफिंग, दुहेरी संरक्षक भिंती, भूमिगत बंकर आशा नवीन आणि अद्यावत आशा संकल्पनांचा वापर करणे आवशक आहे. यामुळेच समाज माध्यमांवर सुरू असणारा ‘ब्लॅकआऊट’चा गवगवा निरर्थकच आहे असे म्हणावे लागेल.




Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here