मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आशिया चषक २०२५ ची स्पर्धा सध्या अत्यंत रोमहर्षक टप्प्यावर पोहचली आहे. क्रिकेटप्रेमींना खिळवून ठेवणाऱ्या या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते, मात्र आता त्यातील दोन संघ गटपातळीवरूनच गारद झाले आहेत. भारताने जबरदस्त कामगिरी करत सुपर-4 फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. दमदार फलंदाजी, काटेकोर गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या गटातील सर्व सामने जिंकत पुढचा टप्पा गाठला आहे. सध्या 5 संघांमध्ये गुणतालिकेत रस्सीखेच सुरु आहे.
ग्रुप-अ मध्ये, भारताने आधीच दुहेरी विजयासह सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांनी युएई आणि पाकिस्तानला हरवले आहे. आता शुक्रवारी ओमान विरुद्ध भारताचा सामना फक्त औपचारिकता असेल कारण ओमान आधीच बाहेर पडला आहे. आज पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना दुसऱ्या स्थानासाठी लढत होईल. पाकिस्तान आणि यूएईच्या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ ग्रुप-अ मधील सुपर-4 मध्ये स्थान निश्चित करेल.
श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश सध्या आशिया चषकाच्या ग्रुप-ब मध्ये दोन पात्रता स्थानांसाठी लढत आहेत, तर हाँगकाँग तीन पराभवांनंतर आधीच बाहेर पडला आहे. तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा सामना १८ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ ग्रुप-ब मधील सुपर-4 मध्ये स्थान निश्चित करेल.
आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक
१७ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
१८ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
१९ सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना–
२० सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
२१ सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
२३ सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
२४ सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
२५ सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
२६ सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
२८ सप्टेंबर – अंतिम सामना
——————————————————————————