प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर भारताने आज ऐतिहासिक झेप घेतली आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला असून, भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) ४.१८ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा केली.
केंद्र सरकारने व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी
GDP वाढीचा वेग
२०२५–२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकासदर ८.२%,गेल्या सहा तिमाहींमधील हा सर्वाधिक विकासदर
अंतर्गत आर्थिक ताकद
- दैनंदिन गरजांवरील
- खर्चात वाढ शहरी मागणी मजबूत
- देशांतर्गत वापरामुळे अर्थव्यवस्था भक्कम
जागतिक अर्थव्यवस्थेतील नवी क्रमवारी
१) अमेरिका
२) चीन
३) जर्मनी
४) भारत
५) जपान
वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था
भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था
महागाई व रोजगार
महागाई नियंत्रणात
बेरोजगारीचे प्रमाण घटत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे.






