कोल्हापूर : प्रसार माध्यम
लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महिलांना आजपासून एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम एप्रिल महिन्याची आहे. मे महिन्याची रक्कम अजून यायची बाकी आहे. त्याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता एप्रिल महिन्यात आला नव्हता. मे उजाडला तरी हप्त्याची काहीच माहिती मिळत नसल्याने ही योजना बंद होणार की काय अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा दिला.
—————————————————————————–