प्रसारमाध्यम डेस्क
रस्त्यावर कोणतेही वाहन चालवत असताना नियमांचे पालन करणे आवश्यक असते. परंतु बऱ्याचदा वाहन चालवत असताना आपल्याकडून अनावधानाने वाहतुकीचा नियम मोडला जातो आणि आपल्याला वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो. तो कसा भरायचा आणि कसा तपासायचा हे आपणाला माहित नसते.
तसेच अनेकवेळा असं देखील होते की, आपल्याकडून ट्रॅफिक नियम मोडला जातो आणि या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसले तरी रस्त्यालगत ठिकठिकाणी असलेले कॅमेरे आपल्यावर लक्ष ठेवतात आणि आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक चलान पाठवलं जातं. हे इलेक्ट्रॉनिक चलान कसं भरायचं हे आपल्याला माहित नसतं. त्याचबरोबर आपल्याला काही दंड झाला आहे का, हे पण माहित नसतं. आता संपूर्ण देशामध्ये वाहतूक दंड लावण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस हे तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा नियम मोडला तर तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीचा नंबर आणि एक फोटो काढून तुमच्यावर दंड ठोठावला जातो. हा दंड तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला हा दंड ऑनलाइन चेक करावा लागतो.
वाहतूक पोलिसांनी लावलेला दंड ऑनलाइन कसा चेक करायचा?
तुम्हाला ई चालान चेक करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला परिवहन विभागाच्या ई चालान वेबसाईटवर जावे लागेल किंवा परिवहन विभागाचे अॅप डाऊनलोड कटावे लागेल.
गुगल प्ले स्टोअर वरुन महा ट्रॅफिक अॅप डाऊनलोड करून घ्या.
अॅप ओपन करा. त्यानंतर चेक ऑनलाईन मव्हिसेस हा त्या ठिकाणी पर्याय दिसेल व यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी चेक चालान स्टेटस वर क्लिक करा.
त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा वाहनाचा नंबर तसेच ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकून इ चालान SMS द्वारे मिळवण्यासाठी च्या पयविर क्लिक करा.
समजा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या चालान मेसेज आला नाही तर डीएल किवा व्हीकल नंबरचा पर्याय निवडावा लागेल.
त्या ठिकाणी जी माहिती विचारलेली असलेली ती माहिती व्यवस्थित भरा आणि गेट डिटेल्स बटणावर क्लिक करा.
आता तुम्हाला दिगून जाईल की तुम्हाला किती आणि कशाचे ई चालान लागले आहे. याबाबत ठांपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसून जाईल,
हे ई चालान तुम्ही ऑनलाइन भरू शकता. त्यासाठी तुम्हाला तिथे पे नाऊ चा पर्याय दिसेल.
हा पर्याय निवडून तुम्ही नेट बँकिंग, केडिट कार्ड किवा डेबिट कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करु शकता.
अशाप्रकारे तुम्हाला लागलेला दंड घरबसल्या ऑनलाइन तपासू शकता. हा झालेला दंड ऑनलाइन तुम्ही कुठूनही भरु शकता.



