पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
145
Guardian Minister N. Prakash Abitkar's birthday was celebrated by social activities at Farale in Radhanagari taluka.
Google search engine

राधानगरी : प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील फराळे येथे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या मंदिर फराळे शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्यकीट,अंडी, बिस्किटे व वह्या-पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कै. सुनंदाबाई डवर फाउंडेशन डवरवाडीच्या वतीने विलास डवर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व अंडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. नामदार गटाचे लक्ष्मण गिरी, सुरेश पाटील, तुकाराम सावंत, आनंदा पाटील यांच्या हस्ते आरोग्यकीट व खाऊ वाटप केले.

या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या प्रोत्साहन मिळाले असून, गावात समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन शिक्षण व आरोग्यवर्धनासाठी दिलेला पाठिंबा लक्षवेधी ठरला. काळम्मावाडी येथे पशुपालक शेतकरी नितीन ज्ञानू माने यांच्या गोट्यामध्ये अज्ञात रोगामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला तर इतर जनावरे आजारी पडली होती. यामध्ये त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं याबाबतची माहिती नामदार गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्या नंतर त्यांनी तालुक्यातून मदत गोळा करत त्यांना २५ हजारांची मदत दिली.

या कार्यक्रमासाठी विलास डवर, विष्णू डवर, लक्ष्मण गिरी, तुकाराम सावंत, सुरेश पाटील, बापूमामा खोराटे, योगेश पाटील, सुनील घारे, सुभाष पाटील, ऋषिकेश टिपूगडे, मयूर पोवार, शांताराम चौगले, राजू गायकवाड, प्रकाश हुजरे, सर्जेराव पाटील, दत्तात्रय जाधव, अमर फराकटे, संतोष पाटील, विजय पाटील, विवेक डोंगळे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक युवराज सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ शिक्षक सुरेश सुतार यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here