कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वास्तविक काही वर्षात महागाई तुलनेने जास्त वाढली आहे. सोने तर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे आज पासून वस्तू व सेवा कराचे दर महागाई वाढीच्या काही प्रमाणात कमी करण्याची अमलबजावणी सुरू केली आहे. जीएसटी २.० या नव्या योजनेमुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार असून दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते वाहनांसारख्या मोठ्या खरेदीपर्यंत सर्वत्र किंमतीत घट होणार आहे.
जीएसटी २.० प्रणाली
मूळ वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वर्षांनी सरकारने त्यामध्ये सुधारणा करत ‘जीएसटी २.०’ लागू केला आहे. यामध्ये करदरांचे सरलीकरण, गरजेच्या वस्तूंवरील करकपात आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन यावर भर देण्यात आला आहे. सरकारच्या मते, यामुळे ग्राहकांचा खर्च कमी होईल, खरेदी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
जीएसटी २.० मुळे कोणत्या वस्तू स्वस्त
कार आणि बाईक: ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना देण्यासाठी वाहनांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकींच्या किंमती काही हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
अन्नपदार्थ : चिप्स, बिस्किट, शीतपेय, पॅकेज्ड स्नॅक्स यांवरचा करदर कमी झाल्याने आता हे पदार्थ स्वस्त मिळतील.
कपडे आणि फुटवेअर : कपडे, शूज, दैनंदिन वापरातील वस्त्रांवरील कर घटल्याने बाजारात सेल्स वाढण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स : मोबाइल फोन, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील करात कपात करून ग्राहकांना थेट फायदा दिला आहे.
सेवा क्षेत्र : रेस्टॉरंट बिल, ट्रॅव्हल पॅकेज आणि डिजिटल सब्स्क्रिप्शन सेवांवरही किंमती कमी होणार आहेत.
जीएसटी २.० मुळे खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल. ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि एफएमसीजी क्षेत्रात विशेष वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर नोकऱ्यांच्या संधींमध्येही वाढ होईल.
तरीही तज्ज्ञांचे मत आहे की करकपातीसोबतच राज्यांना मिळणारा महसूल टिकवून ठेवणे सरकारसमोरचे मोठे आव्हान असेल. शिवाय, लहान व्यापाऱ्यांना नव्या जीएसटी प्रणालीशी जुळवून घ्यावे लागेल.