कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या ४२ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठीचे सर्किट बेंच वास्तवात उतरणार आहे. उद्या ( रविवार, १७ ऑगस्ट ) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सीपीआर समोरील नव्या सर्किट बेंच इमारतीचे फित कापून उद्घाटन होणार असून, त्यानंतर मेरी वेदर ग्राऊंडवर मुख्य समारंभ पार पडेल.
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्यासह अनेक मान्यवर कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या सोहळ्यासाठी मंत्री, सहा जिल्ह्यातील वकिल, नागरिक असे तब्बल पाच हजार जण उपस्थित राहणार आहेत.
मोठ्या संख्येने लोकवर्गणी होणार असल्याने सीपीआर समोरील परिसर आणि मेरी वेदर ग्राऊंडवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, करवीर नगरी उद्याच्या या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत सज्ज झाली आहे.
————————————————————————————————