कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांमुळे जागतिक आर्थिक बाजारात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इतर अनेक देशांमधील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी देशभरात सोन्याच्या दरात घट झाली आहे.
एप्रिल महिन्यात अमेरिकेने १० टक्के बेस टॅरिफ लावले होते, तसेच काही देशांवर पन्नास टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सीमा शुल्क आकारण्यात आले होते. ही टॅरिफ ९ जुलै रोजी संपत आहे. मात्र, १ ऑगस्टपासून व्यापार करार न झालेल्या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचा इशारा दिला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दरावर याचा परिणाम झाला असून आजचे दर खालीलप्रमाणे आहेत.
-
कोल्हापूर : २४ कॅरेट सोनं : ₹ ९६,८५० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं : ₹ ८८ ,७५० प्रति १० ग्रॅम, चांदी : ₹१,०९,५०० प्रति किलो
-
सांगली : २४ कॅरेट सोनं: ₹ ९६,८०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं : ₹८८,७०० प्रति १० ग्रॅम, चांदी: ₹१,०९,६०० प्रति किलो
-
सातारा : २४ कॅरेट सोनं: ₹९६,९०० प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं: ₹८८,८०० प्रति १० ग्रॅम, चांदी: ₹ १,०९, ४०० प्रति किलो
जागतिक बाजारात निर्माण झालेली अनिश्चितता पाहता, पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि दागिने खरेदीदारांनी योग्य वेळ पाहून व्यवहार करावेत, असा सल्ला सराफ व्यावसायिक देत आहेत. अमेरिकेतील टॅरिफ धोरण, व्यापार करारांची अनिश्चितता आणि जागतिक घडामोडी यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहेत.
——————————————————————————–



