कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल १,५०० रुपयांची वाढ झाली असून दोन दिवसांत सोन्या-चांदीत प्रत्येकी अडीच हजार रुपयांची उसळी नोंदली गेली आहे.
-
सोने ( जीएसटीसह ) : ₹१,२०,५०० प्रति तोळा
-
चांदी ( जीएसटीसह ) : ₹१,५१,००० प्रति किलो
काल ( २९ सप्टेंबर ) येथे सोन्याने ₹ १,१९,३०० तर चांदीने ₹ १,५०,००० चा उच्चांक गाठला होता. म्हणजेच दोन दिवसांत सोन्याचा भाव तब्बल ₹ २,५०० ने आणि चांदीचा भाव ₹ २,५०० ने वाढला आहे.
goodreturns.in नुसार राष्ट्रीय दर ( ३० सप्टेंबर सकाळी )
-
२४ कॅरेट १ ग्रॅम सोने : ₹ ११, ८४६
-
२२ कॅरेट १ ग्रॅम सोने : ₹ १०, ८६०
-
चांदी १ किलो : ₹ १, ५१, ०००
IBJA सकाळचे दर (कराशिवाय)
-
२४ कॅरेट (१० ग्रॅम) : ₹ १,१६,९००
-
२३ कॅरेट : ₹ १,१६,४४०
-
२२ कॅरेट : ₹ १,०७,००८
-
१८ कॅरेट : ₹ ८७,६८०
-
१४ कॅरेट : ₹ ६८,३९०
-
चांदी (१ किलो) : ₹ १,४४, ३८७
IBJA दरांमध्ये कर आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नसल्याने सराफा बाजारातील भाव यापेक्षा जास्त दिसतात.
कोल्हापूर-सांगली-सातारा अंदाजे बाजारभाव (३० सप्टेंबर)
(स्थानिक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार)
-
कोल्हापूर : २४ कॅरेट सोने ₹ १,२०,३०० प्रति तोळा, चांदी ₹ १, ५०,८०० प्रति किलो
-
सांगली : २४ कॅरेट सोने ₹१,२०, २०० प्रति तोळा, चांदी ₹ १,५०,७०० प्रति किलो
-
सातारा : २४ कॅरेट सोने ₹ १, २०, १०० प्रति तोळा, चांदी ₹ १,५०,६०० प्रति किलो