पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
गेली पाच महिने पगारच झाला नसल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू भोवती नियमित करण्यात येणारी स्वच्छता ठप्प झाली आहे. यामुळे या वास्तूंभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पन्हाळा गडावर पर्यटकांची सध्या मोठी गर्दी आहे. या पर्यटकांना अस्वच्छता अनुभवायला मिळत असून त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेली पाच महिने पगार नसल्याने पूर्ण राज्यात संप पुकारला आहे. या संपामुळे पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू भोवती नियमित करण्यात येणारी स्वच्छता ठप्प झाली आहे. या संपामुळे ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूची नियमित स्वच्छता पूर्णतः बंद झाली आहे. गवत वाढले आहे, कचरा साचला आहे, काही ठिकाणी दुर्गंधीही पसरत आहे. या परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामे पाकीटे, थर्माकोलचे कप, आणि इतर कचऱ्याचा ढीग तयार झाला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे गडावर पर्यटकांची गर्दी वाढली असून ही ठिकाणं पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना ही अस्वच्छता अनुभवायला मिळत असून पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पन्हाळगडावर ५ ते ६ पुरातत्त्व विभागाचे कंत्राटी कर्मचारी नियमितपणे स्वच्छतेचं काम करत असतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी पगार न झाल्याने संपावर गेले आहेत. यामुळे पन्हाळा गडावरील सर्वच ऐतिहासिक वस्तूंच्या परिसरातील स्वच्छता होत नाही या कारणाने या वास्तूंभोवती कचऱ्याचे ढिग लागले आहेत. गडावरील अंबरखाना, सज्जा कोठी, धान्याचे कोठार, तीन दरवाजा अशा ऐतिहासिक वास्तूंभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊच्या रिकाम्या पाकिटांचे ढीग, थर्माकोलचे कप, पिशव्या आणि इतर कचरा साचला आहे.
सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. अनेक पर्यटक खास गडावरील ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी येत आहेत. मात्र त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहून अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही पर्यटकांनी ही गंभीर बाब समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. पर्यटकांसाठी ही ऐतिहासिक ठिकाणं आकर्षणाचं केंद्र आहेत. पण तिथेच अस्वच्छतेचं चित्र दिसल्याने पन्हाळगडावरील पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी पन्हाळा गडावरील स्थानिक व्यावसायिक, टुरिस्ट गाईड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे आणि पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली आहे की, कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ अदा करून गडावरील स्वच्छतेचं काम पूर्ववत करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.