spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeसंविधान‘कोल्हापूर सर्किट बेंच’ साठी चार न्यायमूर्तीं

‘कोल्हापूर सर्किट बेंच’ साठी चार न्यायमूर्तीं

कामकाज १८ ऑगस्टपासून सुरू

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सोमवार, १८ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. यासाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती झाली असून त्यांचे बसण्याचे ठिकाण आणि कामकाजाचे स्वरूप निश्चित झाले आहे. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एच. एम. भोसले यांच्या स्वाक्षरीने १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला.

खंडपीठ कामकाज
  • न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख यांची नियुक्ती जुन्या कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीतील कोर्ट रूम क्रमांक एक मधील खंडपीठात झाली आहे.
  • त्यांच्या खंडपीठासमोर पुढील प्रकारची प्रकरणे येणार आहेत –
    • जनहित याचिका, नागरी रिट याचिका
    • फर्स्ट अपील, फॅमिली कोर्ट अपिल
    • करसंबंधी वाद, कमर्शियल कोर्ट्स ॲक्टमधील अपील
    • लेटर्स पेटंट अपील
    • गुन्हेगारी रिट, फौजदारी अपिल, मृत्युदंड पुष्टी असलेले खटले
    • गुन्हेगारी अवमान याचिका
    • पॅरोल, फर्लो, शिक्षा कमी करण्यासंबंधी विनंत्या
सिंगल बेंच क्रमांक एक
  • न्यायमूर्ती शिवकुमार डिगे हे आरसीसी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कोर्ट रूम क्रमांक दोन मध्ये बसतील.
  • त्यांच्या बेंचकडे पुढील प्रकरणे येतील –
    • फौजदारी अपील
    • गुन्हेगारी रिट
    • क्रिमिनल रिव्हिजन
    • जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज
    • मध्यस्थी व सलोखा कायद्यानुसार प्रकरणे
सिंगल बेंच क्रमांक दोन
  • न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर हे आरसीसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कोर्ट रूम क्रमांक तीन मध्ये बसतील.
  • त्यांच्या बेंचकडे पुढील प्रकरणे येतील –
    • नागरी रिट याचिका
    • सेकंड अपील
    • नागरी पुनरावलोकन अर्ज
    • आदेशाविरुद्धची अपिले
    • कंपन्या कायदा व बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत प्रकरणे
न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांची पार्श्वभूमी
  • न्यायमूर्ती कर्णिक हे मूळचे नाशिकचे असून त्यांचे कायदेविषयक शिक्षण पुण्यात झाले.
  • मार्च २०१६ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

———————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments