spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगअन्नपदार्थ ,औषधे स्वस्त होण्याची शक्यता

अन्नपदार्थ ,औषधे स्वस्त होण्याची शक्यता

जीएसटीत होणार सुधारणा : मध्यमवर्गीय, शेतकरी व उद्योगांना दिलासा

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या घोषणेनंतर देशात जीएसटी सुधारणा (GST २.० ) लागू होण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सध्याचे चार टॅक्स स्लॅब  ( ५%, १२ %, १८ % आणि २८ %) कमी करून फक्त दोन स्लॅब – ५ % आणि १८ % ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे २०१७ नंतरचा हा सर्वात मोठा बदल ठरणार आहे.
कोणत्या वस्तूंवर किती जीएसटी लागणार ?
  • आवश्यक वस्तू : अन्नपदार्थ, औषधे, शिक्षण व दैनंदिन गरजेच्या वस्तूंना 0 % किंवा ५ % कर श्रेणीत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे या वस्तू अधिक स्वस्त होणार आहेत.
  • घरगुती उपकरणे : टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तूंवरील कर २८ % वरून १८ % करण्यात येऊ शकतो.
  • कृषी उपकरणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रिंकलर व इतर उपकरणांवरील जीएसटी १२ % वरून ५ % पर्यंत कमी होऊ शकतो.
  • विमा सेवा : सध्या १८ % असलेला जीएसटी दर कमी करून ५ % किंवा शून्य करण्याची शक्यता आहे. विमा क्षेत्रातील दीर्घकाळची मागणी पूर्ण होऊ शकते.
  • ऑनलाइन गेमिंग आणि ‘डीमेरिट गुड्स’ : ऑनलाइन गेमिंग, सिगारेट, गुटखा व इतर चैनीच्या वस्तूंवर ४० % पर्यंत उच्च कर लागू होऊ शकतो.
इतर वस्तू :
    • हिरे : ०.२५ %
    • सोने-चांदी : ३ % ( दर कायम राहण्याची शक्यता )
    • पेट्रोलियम उत्पादने : अद्यापही जीएसटीबाहेर ठेवली जाण्याची शक्यता.
१२ % आणि २८ % स्लॅबचे काय होणार ?
  • १२ % स्लॅबमधील ९९ % वस्तू थेट ५ % स्लॅबमध्ये जाणार.
  • २८ % स्लॅबमधील ९० % वस्तू कमी होऊन १८ % स्लॅबमध्ये आणल्या जाणार.
अपेक्षित परिणाम
  • बहुतांश आवश्यक व मध्यमवर्गीय वापराच्या वस्तू स्वस्त होतील.
  • कृषी व विमा क्षेत्राला दिलासा मिळेल.
  • लक्झरी व डीमेरिट वस्तूंवर जास्त कर, त्यामुळे त्यांची किंमत वाढेल.
  • सरकारच्या महसुलात तात्पुरती घट अपेक्षित आहे; पण कर भरणाऱ्यांची संख्या वाढल्याने आणि अर्थव्यवस्था गतीमान झाल्याने तो तोटा भरून निघेल, असा सरकारला विश्वास आहे.
या प्रस्तावावर तीन मंत्रिगटांची समीक्षा होणार असून, अंतिम निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेतला जाईल. ही सुधारणा दिवाळी २०२५ च्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे.

———————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments