पीएफची शिल्लक कमी तरी मिळणार ५० हजारांचा लाभ

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी दिलासा

0
175
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) कडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण अधिसूचनेनुसार, आता एखाद्या कर्मचाऱ्याचा पीएफ बॅलन्स ५० हजार रुपये पेक्षा कमी असला तरीही, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला किमान ५० हजार इतका विमा लाभ मिळणार आहे.
पूर्वीच्या नियमांनुसार, मृत कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम शिल्लक असणे आवश्यक होते, म्हणजेच काही प्रमाणात रक्कम जमा असणे ही विमा लाभासाठी पात्रतेची अट होती. मात्र, ही अट आता रद्द करण्यात आली असून, कर्मचारी कोणत्याही पीएफ बॅलन्ससह या योजनेखाली विमा लाभासाठी पात्र ठरणार आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटन योजनेतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना एकरकमी विमा रक्कम दिली जाते. आता, किमान ५० हजारपासून ते कमाल ७ लाखांपर्यंत हा लाभ मिळू शकतो. सुधारित नियमामुळे कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबियांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे.

ही सुधारणा कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. देशभरातील लाखो पीएफ सदस्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे, कारण कमी पीएफ बॅलन्स असतानाही त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक रक्षण सुनिश्चित होणार आहे.

——————————————————————————–

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here