spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeराजकीयकोल्हापूर महानगरपालिका : स्थापना, इतिहास

कोल्हापूर महानगरपालिका : स्थापना, इतिहास

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

 कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ३ सप्टेंबर रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर शहरवासियांना आता महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निमित्त आम्ही आपल्या प्रसारमाध्यम न्यूज पोर्टलच्या माध्यमातून महानगरपालिका कायदा, कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास, बहु सदस्यीय प्रभाग रचना आणि त्याचे फायदे तोटे हे आपण जाणून घेणार आहोत.

 महानगरपालिका व्यवस्था आणि कायदा 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ हा बृहन्मुंबई वगळता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन करण्यासाठी आणि त्यांचे कार्य नियंत्रित करण्यासाठी तयार केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. परंतु सन १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात महानगरपालिका या व्यवस्थेला कायदा लागू झाला. १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी महानगरपालिकांची निर्मिती करण्यात आली. यात महापौर, उपमहापौर , नगरसेवक असे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. लोकप्रतिनिधी हे धोरणात्मक निर्णय घेतात आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हि प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते.

स्थापना आणि इतिहास

१२ ऑक्टोबर १८५४ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. यापूर्वी मार्च १९४१ मध्ये स्थानिक स्वराज्य संघ हि संस्था स्थापन करण्यात आली. डिसेंबर १९७२ मध्ये नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. ऑगस्ट १९७८ मध्ये खऱ्या अर्थाने कोल्हापूरची पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली.

सन २०१५ साली झालेल्या शेवटच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेत एकूण ८१ प्रभाग होते आणि यावेळी एक सदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात होती. सन १९७८ पासून सन २०२० या ४२ वर्षांच्या कालावधीत ३० महापौर होऊन गेले आहेत. सर्वात पहिल्यांदा बाबुराव पारखे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर पद भूषविले. त्यांचा कालावधी होता ६ मार्च १९८१ ते २० ऑगस्ट १९८१ . निलोफर आजरेकर या मावळत्या महानगरपालिकेच्या महापौर होत्या. त्यांचा कालावधी १७ फेब्रुवारी २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० असा होता.

सन १९२९ ला कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीचा पूर्व, दक्षिण व उत्तरचा भाग बांधणेत आला. त्यानंतर १९९३ साली पश्चिमेकडील भाग बांधल्याने इमारतीला चौकोनी आकार मिळाला.

———————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments