कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली असून, या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंमलबजावणी 2026 पासून शक्य
द इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, अम्बित कॅपिटलच्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाचा लाभ सुमारे १ कोटी १० लाख कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना होणार आहे. नवीन वेतनश्रेणीची अंमलबजावणी जानेवारी २०२६ पासून होऊ शकते. मात्र, त्याआधी आयोगाचा अहवाल तयार होणे, तो केंद्र सरकारकडे सादर करणे, आणि सरकारकडून त्यास मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
नेतृत्व आणि अटी
आतापर्यंत सरकारने फक्त आयोगाची घोषणा केली असून, आयोगाचं नेतृत्व कोण करणार, त्यासाठी कोणत्या अटी असतील, हे अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग आणि पेन्शनधारक यांचं लक्ष या पुढील टप्प्याकडे लागलेलं आहे.
आठव्या वेतन आयोग
- आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी: जानेवारी २०२६ (अपेक्षित)
- संभाव्य पगारवाढ: ३० ते ३४ टक्के
- लाभार्थी: सुमारे १.१० कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक
- सध्या स्थिती: फक्त घोषणा झाली; अहवाल आणि मंजुरी प्रलंबित
————————————————————————————-