कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदा कुणालाही समजायच्या आतच पावसाळा सुरु झाला. वळीव पाऊस सुरु झाला आणि याचवेळी वेशीवर कधी मान्सून आलाय हे समजलेच नाही. यामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कारण मृग नक्षत्र यावर्षी ८ जूनला सुरू होणार आहे. मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो असे संकेत आहेत. मात्र रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यावर पावसाळा झालाय. शेतकरी मृग नक्षत्राचा अंदाज घेऊनच शेतीची मशागत पूर्ण करून शेत तयार ठेवतो. याशिवाय शेतात उन्हाळी पिक असेल तर ते काढून परत रब्बी हंगामासाठी शेत तयार करतो. मात्र यावर्षी १२ दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे. अर्थात पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी जवळपास १५ दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. गेल्य्या पाच दिवसापासून जोरात पाऊस सुरु आहे. यामुळे मशागतीची काम ठप्प झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यानी काय करावे….
यावर्षी पावसाळा मशागत होण्यापूर्वीच सुरु झालाय. मात्र शेतकऱ्याने चलबिचल न होता काही महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक करावीत. अशा परिस्थितीत जमिनीत चिखल व ओलावा वाढलेला असतो, त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास पुढील कामे करणे उपयुक्त ठरेल:
-
उभ्या पिकांचे संरक्षण:
-
ज्या पिकांची कापणी झाली नाही, ती पिकं जास्त पावसापासून वाचवण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था करा.
-
पिकांभोवती नाले खणून पाणी साचू न देता बाहेर जाण्याची सोय करा.
कापणी केलेल्या पिकांचे व्यवस्थापन:
-
कापलेले धान्य, कडधान्य किंवा इतर पिकं आडोशात, शेडखाली किंवा प्लास्टिक शीटने झाकून ठेवा.
-
शक्य असल्यास वाळवलेले पीक तात्काळ घरात किंवा गोदामात हलवा.
-
पाण्याचा निचरा करणे:
-
पाऊस पडत असताना किंवा त्यानंतर शेतात पाणी साचत असल्यास लगेच निचरा करण्याची सोय करावी.
-
खाच-खळगे, गटारे साफ करून पाण्याचा योग्य मार्ग करावा.
जमिनीचे निरीक्षण:
-
जमिनीतील ओलावा तपासावा आणि त्यानुसार मशागत लांबवावी किंवा योग्य वेळी करावी.
-
मातीच्या प्रकारानुसार पाण्याचा अतिरेक नुकसानकारक होऊ शकतो. म्हणूनच शेतातून पाणी जाण्याची सोय करावी.
तण नियंत्रण:
-
ओलसर हवामानात तणांची वाढ जलद होते. त्यामुळे सुरुवातीसच तणनियंत्रण करणे फायदेशीर ठरेल.
-
हाताने, कोळपणी करून किंवा जैविक/रासायनिक उपायांचा वापर करावा.
सेंद्रिय खते आणि शेणखत टाकणे:
-
जमिनीवर ओलावा असताना शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट टाकल्यास ते चांगले मिसळते आणि जमिनीचा कस वाढतो.
बियाण्यांची निवड व प्रक्रिया:
-
पेरणीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी.
-
बियाण्यांचे रोगप्रतिबंधक व बुरशीनाशक प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
पेरणीपूर्व तयारी:
-
बीट, सऱ्या, गादी वाफा तयार ठेवण्याची तयारी करता येते.
-
काही पिकांची उभी पेरणी किंवा निंबकर पद्धत वापरता येते.
पिकांची निवड आणि योजना:
-
पावसाळा लवकर सुरू झाल्यास लवकर पेरणी होणारी व कमी कालावधीतील पिके निवडावीत.
-
शेतकऱ्याने स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन योग्य पीक संरचना करावी.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब:
-
पावसाळ्यात विविध पीक एकत्र घेऊन आंतरपीक पद्धतीचा अवलंब करता येतो – जसे मका + तुर, सोयाबीन + उडीद