भेसळयुक्त दूध आढळले तर मालकावर थेट कारवाई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा..

0
125
Direct action will be taken against the owner if adulterated milk is found: Minister of State for Home Affairs Yogesh Kadam warns.
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज 

बाजारात विशेषत ग्रामीण भागात होणाऱ्या सुट्ट्या दुधाची ऑन दी स्पाॅट तपासणी होणार आहे. यासंदर्भात ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारीनंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताफ्यात अद्ययावत ‘मिल्को स्क्रीन मशीन’ दाखल होणार आहे. या मशीनच्या माध्यमातून सुट्ट्या दुधात भेसळ झालीं असल्यानं ती स्पष्ट होणार आहे. भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.

राज्यातील जनतेला शुद्ध दूध मिळावे यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे. नामांकित कंपन्या पिशवीतील दुधाची विक्री करतात. परंतु कंपनीतून आलेले दूध ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यात भेसळ झाल्याचे एफडीएने केलेल्या कारवाईतून अनेकदा समोर आले आहे. पिशवीतील दुधाची जकात नाका, दुकानात जाऊन तपासणी करण्यात येते. भेसळयुक्त दूध असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते. परंतु आजही सुट्ट्या दुधाची विक्री होते.. मात्र सुट्ट्या दुधात भेसळ केली आहे की नाही हे तपासण्याची कुठलीच यंत्रणा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नाही. याआधी दुधाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवले जात होते. परंतु मिल्को स्क्रीन मशीन मुळे दुधातील भेसळ काही मिनिटांत उघडकीस येते. ऑन दी स्पाॅट सत्यता समोर आल्यास संबंधित मालकावर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.

१५९ फूड निरीक्षकांची भरती :

अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने योग्य प्रकारे कारवाई होत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात १५९ फूड निरीक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

स्ट्रीट फुडला मिळणार गुणवत्तेचा दर्जा :

मुंबईच्या रस्त्यांवर गल्लोगल्ली स्ट्रीट फूड स्टॉल असून लोकही स्ट्रीट फूडचा अस्वाद घेत असतात. परंतु त्यांना मिळणारे स्ट्रीट फूड उत्तम दर्जाचे आहे की नाही याची तपासणी योग्य प्रकारे होत नाही. लोकांच्या आरोग्याची काळजी घेत स्ट्रीट फूडची तपासणी करण्यात येणार असून उत्तर दर्जाचे स्ट्रीट फूड असल्यास त्या विक्रेत्याला गुणवत्तेनुसार दर्जा ( स्टार ) देण्यात येणार आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here