spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeपर्यावरणवीज पडून होणाऱ्या मृत्युंमध्ये होतेय वाढ : कारणे आणि उपाय ..

वीज पडून होणाऱ्या मृत्युंमध्ये होतेय वाढ : कारणे आणि उपाय ..

प्रसारमाध्यम डेस्क

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासाह वळीव पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याला वळीव पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. वीजांच्या कडकडाटासहित आलेल्या या वळीव पावसात फक्त मराठवाड्यातच वीज पडणे, पूर आणि इतर पावसाशी संबंधित घटनांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू हे वीज पडण्यामुळे झाले असल्याचे एका अहवालात म्हटलं आहे. वीज पडून मृत्यू होण्याचं वाढतं प्रमाण ही एक गंभीर बाब आहे. पावसाळा सुरू झाला की आकाशात वीजेच्या चमचमाटासह कडकडाट ऐकू येतो. ही दृश्यं जरी मनमोहक वाटली, तरी त्यामागे जीवघेणा धोका लपलेला असतो. दरवर्षी भारतात अनेक लोक वीज पडून मृत्युमुखी पडतात, आणि दुर्दैवाने ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. वीज पडणे टाळता येत नाही, पण तिच्यामुळे होणारी हानी निश्चितच टाळता येऊ शकते — गरज आहे ती जागरूकतेची आणि सावधगिरीची. यासंदर्भात प्रसारमाध्यम न्यूजचं हे एक विशेष वृत्त..

गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात वळीव पावसाचा जोर दिसून येत आहे. सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीज पडण्याचे प्रकार झाले आहेत. प्रकृतीच्या अनेक चमत्कारांपैकी विजेचा कडकडाट आणि वीज चमकणे हे एक विस्मयकारक पण धोकादायक नैसर्गिक दृश्य आहे. परंतु यामध्ये दडलेला धोका अत्यंत गंभीर असतो. दरवर्षी भारतात आणि विशेषतः ग्रामीण भागांत वीज पडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडतात. वीज म्हणजेच आकाशीय वीजा ही ढगांमध्ये तयार होणाऱ्या विद्युतशक्तीचा परिणाम असते. ढगांमध्ये असलेल्या जलकणांमुळे घर्षण निर्माण होतो आणि विद्युत आवेश तयार होतो. ज्यावेळी हाच आवेश जमिनीशी किंवा इतर वस्तूंशी (उंच झाडे, इमारती, मनुष्य) संपर्क साधतो, तेव्हा वीज पडते. ही वीज अत्यंत वेगवान आणि उच्च तापमानाची असते. वीज पृथ्वीवर पडते तेव्हा तिचे तापमान अत्यंत जास्त असते सुमारे ३०,००० अंश सेल्सियस पर्यंत जाऊ शकते. हे तापमान म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाच्या सहा पट अधिक म्हणजेच सुमारे ५,५०० अंश सेल्सियस इतके असते. इतक्या प्रचंड उष्णतेमुळे वीज पडताच आसपासच्या हवेमध्ये अचानक प्रसार होतो, त्यामुळे कडकडाटाचा आवाज ऐकू येतो. या आवाजालाच थंडर असं म्हणतात. आशा उच्च तापमान असणाऱ्या विजेचा संपर्क मनुष्यप्राण्याशी झाल्यास काही क्षणांत मृत्यू होऊ शकतो.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वीज पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फक्त मराठवाड्यातच वीज पडणे, पूर आणि इतर पावसाशी संबंधित घटनांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू हे वीज पडण्यामुळे झाले असल्याचे एका अहवालात म्हटलं आहे. आणि ही बाब निश्चितच गंभीर आहे. आपण पहिल्यांदा वीज पडून मृत्यू होण्याची काही कारणं पाहू.

 मोकळ्या मैदानात उभं राहणं

शेतकरी, चरवाहे किंवा खेळणारी मुले उघड्यावर असताना वीज पडल्यास मोठा धोका संभवतो. झाडांखाली आसरा घेणं –
अनेकांना वाटतं झाडाखाली थांबणं सुरक्षित असेल. परंतु झाडं उंच असल्यामुळे वीज सहज तिथे आकर्षित होते.

 धातू किंवा मोबाईल जवळ असणं

यामुळे वीजेचा प्रवाह अधिक वेगाने शरीरात प्रवेश करू शकतो, जरी याबाबत अजून वैज्ञानिक एकमत नाही.

 इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

हवामान खात्याच्या सूचना दुर्लक्षित केल्या जातात, ज्यामुळे अपघात टळत नाहीत. या काही कारणांमुळे वीज पडून मृत्यू होतात.

ही काही कारणं माहीत असून सुद्धा लोक याबाबत काळजी घेत नाहीत आणि यामुळेच वीज पडून होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. असे प्रसंग टाळण्यासाठी काय उपाय आहेत तेही आपण पाहू.

वीज पडण्यापासून वाचण्यासाठी उपाय

 पावसाळ्यात ‘मौसम अ‍ॅप’, ‘दामिनी अ‍ॅप’ वापरून वीज पडण्याची शक्यता तपासा.

वीज चमकत असताना उघड्यावर राहू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

मोबाईल, लोखंडी वस्तू दूर ठेवा.

पाणी किंवा धातूच्या संपर्कात येणं टाळा.

झाडाखाली थांबणं टाळा — हे अनेक वेळा घातक ठरते.

वीज पडताना घरात असाल, तर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद ठेवा आणि प्लग काढून टाका.

वीज पडून होणारे मृत्यू थांबवायचे असतील तर शासनाने यावर धोरणात्मक काम करण्याची गरज आहे. यासाठी शाळा आणि गाव पातळीवर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून पूर्वसूचना प्रणालीचा विशेष वापर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या आपघातासाठी विम्याची एखादी विशेष योजना अस्तित्वात आणली पाहिजे जेणेकरून वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसानां योग्य आर्थिक मदत मिळेल.












RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments