पन्हाळा : प्रसारमाध्यम न्यूज
सार्वजनिक बांधकाम विभागाने पन्हाळा ते बुधवार पेठ पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवीण्यासाठी पन्हाळा शहरात मुस्लिम गल्लीत व नाक्या पासून बुधवार पेठ शाळे पर्यंत खड्डे बुजवण्यापेक्षा मुळ रस्त्यावरच रस्ता केला. पण, संततधार बरसणाऱ्या पावसाने केलेल्या रस्त्याची संपूर्ण खडी उचकटल्याने रस्त्यावर बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्याची खडी संपूर्ण रस्ताभर झाल्याने वाहन चालविणे किंवा चालत जाणे मुश्किल झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पन्हाळगडावर मार्च महिन्यात येणार होते. त्यावेळी रस्त्याचे खड्डे भरून त्यावर रस्ता केला. पण त्यावर अस्तरीकरण केले नाही ते मे महिन्याच्या अखेरीस केले जाणार होते. याची निविदा व निघणारे देयक एकदम जून महिन्यात काढले जाते, अशी माहिती विभागीय अभियंता अमोल कोळी यांनी दिली. पण चालू वर्षी पावसाने घोटाळा केला आणि रस्त्याने निविदे पासून देयका पर्यंत सत्य उघडकीस आणले. खड्डे भरणाऱ्या खडीत डांबर नसल्याने अस्तरीकरण होणाऱ्या रस्त्यावरच सारी भिस्त असल्याचे दिसून आली.
नव्याने केलेला रस्ता उखडल्याने रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे. या पसरलेल्या खडीमुळे कुठल्याही दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात झालेला नाही. तशी शक्यताही नाही. पण, याठिकाणी वाहतूक हळूहळू होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील पसरलेली सर्व खडी काढून घेत असल्याचे अभियंता अमोल कोळी यांनी सांगितले
———————————————————————————————






