spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगIMPS व्यवहारावर शुल्क आकारणी

IMPS व्यवहारावर शुल्क आकारणी

SBI, HDFC, PNB, कॅनरा बँकांचा निर्णय

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
इंटरनेट व मोबाइल बँकिंग द्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत मोफत असलेली IMPS ( Immediate Payment Service) सेवा आता शुल्कासह उपलब्ध होणार आहे. देशातील चार मोठ्या बँकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक आयएमपीएस वर शुल्क आकारणी सुरू केली आहे. हे नवे दर १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले असून, एचडीएफसी बँकेत १ ऑगस्ट पासूनच नवा नियम लागू झाला आहे.
IMPS म्हणजे काय ?
IMPS ही रिअल टाइम पेमेंट सेवा आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही सेवा चालवते. यामुळे ग्राहक कोणत्याही वेळेस, २४x७ तातडीने पैसे पाठवू शकतात. आतापर्यंत डिजिटल व्यवहार मोफत असल्याने ग्राहकांचा कल वाढला होता. मात्र, आता या शुल्क आकारणीमुळे डिजिटल व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
SBI चे नवे शुल्क
  • ₹ २५,००० पर्यंत : शुल्क नाही
  • २५,००० ते १ लाख : ₹ २ + जीएसटी
  • ₹ १ लाख ते २ लाख : ₹ ६ + जीएसटी
  • ₹ २ लाख ते ५ लाख : ₹ १० + जीएसटी
कॅनरा बँकेचे नवे शुल्क
  • ₹ १,००० पर्यंत : शुल्क नाही
  • ₹ १,०००  ते १०,००० : ₹ ३ + जीएसटी
  • ₹ १०,००० ते २५,००० : ₹ ५ + जीएसटी
  • ₹ २५,००० ते १ लाख : ₹ ८ + जीएसटी
  • ₹ १ लाख ते २ लाख : ₹ १५ + जीएसटी
  • ₹ २ लाख ते ४ लाख : ₹ २० + जीएसटी
पंजाब नॅशनल बँक (PNB) चे नवे शुल्क
  • ₹ १,००० पर्यंत : शुल्क नाही
  • १,०००१ ते १ लाख :
    ▪ ब्रांचमार्फत : ₹ ६ + जीएसटी
    ▪ ऑनलाइन : ₹ ५ + जीएसटी
  • ₹ १ लाखापेक्षा जास्त :
    ▪ ब्रांचमार्फत : ₹ १२ + जीएसटी
    ▪ ऑनलाइन : ₹ १० + जीएसटी
एचडीएफसी बँकेचे नवे शुल्क ( १ ऑगस्ट पासून लागू)
  • ₹ १,००० पर्यंत :
    ▪ सामान्य ग्राहक : ₹ २.५० 
    ▪ ज्येष्ठ नागरिक : ₹ २.२५ 
  • ₹ १,००० ते १ लाख :
    ▪ सामान्य ग्राहक : ₹ ५
    ▪ ज्येष्ठ नागरिक : ₹ ४.५० 
  • ₹ १ लाखापेक्षा जास्त :
    ▪ सामान्य ग्राहक : ₹ १५ 
    ▪ ज्येष्ठ नागरिक : ₹ १३.५० 
  • गोल्ड व प्लॅटिनम खातेधारक : शुल्क नाही
या नव्या नियमामुळे लाखो ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, व्यवहाराचा वाढता खर्च आणि तांत्रिक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शुल्क आकारणी केली जात आहे. मात्र, ग्राहकांचा डिजिटल व्यवहाराकडे असलेला ओढा कमी होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments