मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मंत्रालयात प्रवेशासाठी असलेली वेळ आता बदलण्यात आली आहे. यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना दुपारी दोन नंतर प्रवेश दिला जात होता. मात्र, मोठ्या रांगा, नागरिकांची होणारी गैरसोय आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेऊन सरकारने नवा शासन निर्णय जारी केला आहे.