spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योग'महाराष्ट्र गृहनिर्माण'चा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र गृहनिर्माण’चा मोठा निर्णय

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या केलेल्या इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवाशांनाही आता हक्काची घरे देण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक म्हाडा प्राधिकरणाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही बाब लक्षात घेत या रहिवाशांनाही मात्र इमारत कोसळलेली असेल वा रिकामी केली असेल तरच तळमजल्यावरील रहिवाशांना पात्र ठरवून बृहतसूची योजनेत सामावून घेतले जाणार आहे. म्हाडाचा हा निर्णय तळमजल्यावरील रहिवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.

याआधी तळमजल्यावरील रहिवाशांना बृहतसूचीअंतर्गत कायमस्वरुपी हक्काची घरं मिळण्याची कोणतीही तरतूद नव्हती. यामुळे तळमजल्यावर राहणारे रहिवासी हक्काच्या घरापासून वंचित होते तर, अनेक जण अजूनही संक्रमण शिबिरातच राहत आहेत. अशा रहिवाशांची तरतूद लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यासह आता अशा इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवासी बृहतसूचीवरील घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरतील.
उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांसाठी म्हाडाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबईतील उपकरप्राप्त इमारती म्हणजे 1969 पूर्वी बांधलेल्या दक्षिण आणि मध्य मुंबईतील जुन्या, भाडे-नियंत्रित इमारती. या इमारती म्हाडा द्वारे त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी वसूल केलेला उपकर किंवा कर आकारला जातो. अशा इमारतींचे बांधकाम वर्षानुसार तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. 1940 आधी बांधल्या गेलेल्या इमारती पहिल्या श्रेणीत येतात तर दुसऱ्या श्रेणीतील इमारती 1940 ते 1950 दरम्यान बांधलेल्या मालमत्ता असतात आणि तिसऱ्या श्रेणीतील इमारती 1951 ते 1969 दरम्यान बांधलेल्या आहेत. या इमारती, ज्यापैकी अनेक जीर्ण अवस्थेत आहेत, विविध शहरी नूतनीकरण योजनांअंतर्गत पुनर्विकासासाठी पात्र आहेत.

ज्या इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत किंवा म्हाडाने अधिग्रहित केले आहेत अशा इमारतींमधील भाडेकरूंचा देखील समावेशासाठी विचार केला जाईल. म्हाडा सध्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करत आहे जेणेकरून त्यांना सप्टेंबर 2019 च्या सरकारी निर्णयानुसार अ, ब आणि क श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकेल.

म्हाडाकडून अतिधोकादायक इमारती किंवा कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांना मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मागणीनुसार संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. अतिधोकादायक म्हणून रिकामी केलेल्या किंवा आधीच कोसळलेल्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यावर रहिवासी संक्रमण शिबिरातून पुनर्वसित इमारतीत राहायला जातात.

त्यानंतर, अशा रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळ्यावरचा हक्क तेव्हा सोडावा लागतो पण, त्याचवेळी अतिधोकादायक आणि कोसळलेल्या इमारतींचा वर्षानुवर्षे पुनर्विकास राखडतो. काही इमारतींचा वेगवेळ्या कारणांमुळे पुनर्विकास होऊ शकत नाही त्यामुळे, अशा रहिवाशांना वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातच रहावे लागते.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments