spot_img
सोमवार, ऑक्टोबर 13, 2025

9049065657

Homeशासकीय योजनाआधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन

आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन

मुंबई :प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ज्या नागरिकांचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुने आहे त्यांना ते अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम १ ऑक्टोबर  पासून लागू करण्यात आला आहे. आधार अपडेट न केल्यास अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. यासाठी शासनाने आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
अपडेटसाठी शुल्क
१ ऑक्टोबर पासून आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्तासारख्या सामान्य सुधारणेसाठी ७५ रुपयांचे शुल्क लागणार आहे. तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती, जसं की फिंगरप्रिंट, फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी १२५ रुपये द्यावे लागतील. मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता १२५ रुपये शुल्क द्यावे लागेल. पण नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे फ्री असणार आहे. 

मुलांच्यासाठी शुल्क नाही 

५ ते ७ वयोगटातील मुलांना आणि १५ ते १७ वयोगटातील किशोरांना बायोमेट्रिक अपडेटसाठी आता शुल्क भरावे लागणार नाही. पूर्वीचे शुल्क ५० रुपये होते, परंतु आता ते माफ करण्यात आले आहे. तथापि, या वयोगटांसाठी बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहेत. वेळेवर ते न केल्यास त्यांचे आधार कार्ड अवैध ठरू शकते.

पत्नी किंवा पतीचे नाव

१५ ऑगस्ट २०२५ पासून नवीन आधार कार्डवर १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकाच्या आधार कार्डवर वडिल किंवा पतीचे नाव आता दिसणार नाही. ही माहिती फक्त UIDAI च्या रेकॉर्डसाठी असेल. या बदलामुळं सतत नाव बदलण्याची गरज नसेल तसंच, लोकांची प्रायव्हसीदेखील सुरक्षित राहिल. महिलांसाठी हे एक मोठं पाऊल आहे. 

जन्मतारखेत बदल

आधार कार्डवर जन्मतिथी फक्त वर्षाच्या स्वरुपातच दिसणार आहे. सुरुवातील पूर्ण जन्मतारिख 01/01/1990 UIDAIच्या रेकॉर्डमध्ये राहणार आहे. आता आधार कार्डवर फक्त नाव, वय आणि पत्ताच दिसणार आहे. 

पत्ता बदलण्यासाठी नवीन दस्तावेज

१ ऑक्टोबर २०२५ पासून सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे. याचा अर्थ  UIDAIच्या वेबसाइट  (uidai.gov.in) किंवा mAadhaar अॅपवर रिक्वेस्ट सबमिट करुन जवळच्या आधार केंद्रावर आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करु शकता.

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments