कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महिला क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धा यंदा अधिक भव्य स्वरूपात पार पडणार असून, आयसीसीने या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतील मोठी वाढ जाहीर केली आहे. ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षिसाची रक्कम तब्बल २९७ टक्क्यांनी वाढवली आहे.
या आधीच्या स्पर्धेत जेथे बक्षिसाची रक्कम तुलनेने मर्यादित होती, तिथे आता खेळाडूंना त्यांच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात मोठं आर्थिक बळ मिळणार आहे. आयसीसीचा हा निर्णय महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या निर्णयामुळे केवळ महिला क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे महिला क्रिकेटच्या दर्जात आणि व्यावसायिकतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला वर्ल्ड कप स्पर्धेस्ठा विजयाची रक्कम १३.८८ मिलियन डॉलर्स म्हणजेच १२२ कोटी रुपयांहून अधिकची आहे. या बक्षिसाच्या रकमेसह आयसीसीने महिला क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विजेत्या, उपविजेत्या आणि साखळी फेरीत या रकमेचं वाटप असे होईल.
महिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला आयसीसीकडून ४.४८ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे. भारतीय रुपयांनुसार बक्षिसाची रक्कम जवळपास ४० कोटी रुपये असणार आहे. उपविजेत्या संघाला विजेत्या संघाच्या तुलनेत निम्मी रक्कम मिळणार आहे. म्हणजे २.२४ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २० कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघाला जवळपास १० कोटी रुपये मिळतील. तर साखळी फेरीत एक सामना जिंकणाऱ्या संघाला ३४ हजार डॉलर मिळतील. तर पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला ६ कोटी मिळतील. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघाला अडीच कोटी रुपये मिळतील. दरम्यान या स्पर्धेत भाग घेतलेला संघ जिंको किंवा हरो त्याला कमीत कमी २ कोटी ५० लाख रुपये मिळणार आहेत.
आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे सामने
-
३० सप्टेंबर, मंगलवार: भारत vs श्रीलंका
-
५ ऑक्टोबर, रविवार: भारत vs पाकिस्तान
-
९ ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs दक्षिण अफ्रीका
-
१२ ऑक्टोबर, रविवार: भारत vs ऑस्ट्रेलिया
-
१९ ऑक्टोबर, रविवार: भारत vs इंग्लैंड
-
२३ ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs न्यूजीलैंड
-
२६ ऑक्टोबर, रविवार: भारत vs बांग्लादेश
————————————————————————