Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

छत्रपती संभाजीनगर: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

नेमकं काय घडलं? पंकजा मुंडे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्या लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाल्या होत्या. विमातळावर हेलिकॉप्टर आकाशात झेपावण्याच्या तयारीत असतानाच तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून वैमानिकाने तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नियोजनावर काय परिणाम झाला? या तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र, कार्यकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याची माहिती मिळताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील आणि सर्व नियोजित सभांना हजेरी लावतील, असे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here