कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पत्नीच्या नावावर मालमत्ता असेल तर ती मालमत्ता तिची वैयक्तिक मालमत्ता मानली जाईल का? या मुद्द्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता तिच्या स्वतःच्या कमाईतून खरेदी केली नसेल तर ती मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता मानली जाईल.
पत्नीला कायदेशीर अधिकार कोणते?
भारतीय कायद्यानुसार पत्नीला पतीच्या जिवंतपणी त्याच्या मालमत्तेवर थेट मालकी हक्क नसतो. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला मुलांइतकेच मालमत्तेवर अधिकार असतात. पतीने मृत्युपत्र केले नाही तर पत्नीला मालमत्तेचा काही हिस्सा मिळू शकतो. अशा परिस्थितीत, पत्नी मालमत्ता विकू शकत नाही किंवा तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही.
अशा परिस्थितीत, पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी करत असेल, तिचे स्वतःचे उत्पन्न नसेल, तर भविष्यात मुले आणि इतर वारस देखील त्या मालमत्तेवर दावा करू शकतात. त्यामुळे पतीच्या नावावर घर, फ्लॅट किंवा इतर प्रॉपर्टी खरेदी करताना योग्य कागदपत्रे आणि मालकीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
पत्नीच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळेल पण, फक्त पत्नीच्या नावावर असेल याची कोणतीही हमी नाही. विशेषतः जर तिने स्वतः कमावलेली नसेल, तर ती मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता मानली जाऊ शकते.