राधानगरी : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियाना मार्फत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान तालुका पातळीवर राबवले जात आहे.मंडलनिहाय शिबिराचे तहसीलदार अनिता देशमुख यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले.
तहसीलमार्फत मंडलनिहाय शिबिरे आयोजन केली असून शिबिरात नागरिकांना महसूल विभागांतर्गत वाटप केले जाणारे विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी योजनेची प्रकरणी मंजूर करणे तसेच रेशन कार्डविषयक युनिटी कमी जास्त व नवीन रेशन कार्ड या अभियाना प्रसंगी राधानगरी येथे लाभार्थ्यांना देण्यात आली.
हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. याअंतर्गत प्रत्येक मंडलात चार शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. तलाठी कार्यालयातून माहिती घेऊन शिबीराचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. यावेळी मंडळ अधिकारी नितीन जंगम,ग्रामविकास अधिकारी अशोक कांबळे,दयानंद कांबळे,जे डी पोवार,वैशाली वागरे, दिपाली पाटील,कोमल पाटील, युवराज पोवार, वेआ बोंडे,तानाजी गुरव,अश्विनी कांरडे,बळवंत पताडे, संदीप टिपुगडे, दीपक शेट्टी, संभाजी आरडे, अनिल बडदारे यांच्यासह महसूल सेवक व पोलीस पाटील उपस्थित होते.