कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घडणारे गैरकृत्ये, बेकायदेशीर कृत्ये, अवैध व्यवसाय तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांना प्रतिबंध करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांना आपल्या वास्तव्याच्या परिसरामध्ये कोणतेही गैरकृत्य आढळून आल्यास, बेकायदेशीर व्यवसाय सुरु असल्यास तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार त्यामध्ये कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण तसेच शाळा, कॉलेज, परिसरामध्ये मुलींची छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याची माहिती पोलीसांना देणे नागरिकांना सुलभ व्हावे या करीता नव्याने हेल्पलाईन सुरु केलेली आहे. सदर हेल्पलाईनचा क्रमांक ९८२२७६६१०० असा असून सदरची हेल्पलाईन ही सर्व नागरिकांसाठी २४ तास सुरु असणार आहे.
आपल्या वास्तव्याचे परिसरामध्ये अथवा आजूबाजूचे परिसरामध्ये वरील प्रमाणे कोणतेही गैरकृत्य आढळुन आल्यास त्याची माहिती तात्काळ सदरच्या हेल्पलाईन नंबर वर देणेत यावी. सदर हेल्पलाईनवर माहिती देणा-या इसमाचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे कोल्हापूर पोलीस दला तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————————————————-