राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
राधानगरी तालुक्यातील जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये शाळा प्रवेश, उत्सव म्हणुन साजरा करण्यात आला. एकावडे चॅरिटेबल ट्रष्टच्या वतीनं सोन्याची शिरोली इथं विद्यामंदिर सोन्याची शिरोली शाळेच्या इयत्ता पहिलीच्या अठरा नवांगत विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधुन रथामध्ये बसवत मिरवणूक काढली.
रथामध्ये विद्यार्थ्यांनी चला शिकूया,पुढे जाऊया..गिरवु अक्षर होऊ साक्षर..चला शिकूया पुढे जाऊया,मराठी शाळेत प्रवेश घेऊयाचे फलक हातात घेतले होते. या मिरवणुकीत पालक आणि ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांचा रथ शाळेच्या चौकात येताच गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, प्रल्हाद एकावडे, उपसरपंच सुवर्णा पोवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष किरण राऊत, मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. यावेळी एकावडे ट्रष्टच्या वतीनं गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी गोविंद चौगले, उत्तम बोडके,दीपक चौगले, प्रणव एकावडे, नारायण आयरे, लता एकावडे, जानवी पाटील, ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
——————————————————————————



