चंदगड : प्रतिनिधी
माणगाव आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र सुंडी, तांबुळवाडी, ढोलगरवाडी, माणगाव, कार्वे,रामपूर आदी ठिकाणी हिवताप जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. सहायक संचालक आरोग्य सेवा हिवताप डॉ. रणवीर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ.विघ्नेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
हनुमान विद्यालय करंजगाव येथे आरोग्य सेविका शुभांगी पाटील यांनी हिवताप जनजागरण मोहीम, एड्स, कुष्ठरोग, क्षयरोग, कावीळ व जलजन्य तसेच कीटकजन्य आजाराबाबत माहिती दिली.
आरोग्य सेविका शुभांगी पाटील- कीटकजन्य साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी घरातील स्वच्छतेबरोबर परिसरातील स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामध्ये घराशेजारील फुटके डबे, टायर यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही. व घरातील खर्चाची भांडी हौद, बरेल, बांधीव हौद इ. आठवड्यातून एकदा स्वच्छ व कोरडी करून वापरावीत व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
————————————————————————————–