कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता १० वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इयत्ता १२ वी ) परीक्षेच्या जून-जुलै २०२५ साठी विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती पुणे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी जून – जुलै २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन गुरुवार दिनांक १२ जून २०२५ रोजी Admit Card या लिंकव्दारे download करण्याकरीता उपलब्ध होतील. या बाबत काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी केले आहे.
महत्त्वाचे –
- सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावी.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
- या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
- ज्या आवेदनपत्रांना Paid असे Status प्राप्त झाले आहे, त्यांचे प्रवेशपत्र “Paid Status Admit Card” या पर्यायातून उपलब्ध होतील.
- अति विलंबाने आवेदन पत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे Extra Seat No Admit Card या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
- Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरुस्त्या असल्यास अथवा विषय, माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.
- ज्या आवेदन पत्रांना प्रिंट असे Status प्राप्त झालेले नाही, अशा उमेदवारांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होऊन “Late Paid Status Admit Card” या Option द्वारे त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावी.
- प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देवून विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे.
—————————————————————————————–