कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूजराज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याचा तसेच आणखी महत्त्वाचे २ निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्या नंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आगामी विधिमंडळ अधिवेशनात हे विधेयक आणणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतना बाबत निर्णय घेण्यात आला असून या विद्यावेतनात ६,२५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०हजारची वाढ करण्यात आली आहे. तर बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता ८ हजार विद्यावेतन मिळणार आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीसाठी प्रयत्न
अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने ही आजच्या बैठकीत उपाय योजले गेले आहेत. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात येणार आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.