कागल प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
तहसीलदार कार्यालयाच्या आवारात फेज टू इमारतीचे बांधकाम होणार आहे या पार्श्वभूमिवर या आवारातील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांना हटवण्यात आले आहे. यामुळे त्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. नवीन होणाऱ्या फेज २ या इमारतीमध्ये मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांना कायमस्वरूपी गाळे बांधून द्यावेत, अशी मागणी करणारे एक निवेदन कागल तहसीलदारांना देण्यात आले आहे.
कागल तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्या दहा ते बारा वर्षापासून शेडमध्ये मुद्रांक विक्री व दस्तऐवज लेखनाचा व्यवसाय करत आहेत.
सोमवारी अचानकपणे फेज टू इमारत बांधकामासाठी या शेड हटवण्यात आल्या आहेत. महसूल वन विभागाच्या आलेल्या पत्राच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या शाहू सुविधा सेतूच्या समोर असलेल्या रिकाम्या जागेत मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक टेबल, खुर्ची ठेवून काम करत आहेत.
—————————————————————————————–