- कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर आणि सांगली पाटबंधारे मंडळाने अलमाट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीला ‘चक्काजाम’ आंदोलन मागे घेण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
आज सकाळपासून कोल्हापूर सांगली मार्गांवरील अंकली पुलावर अलमाट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीचे चक्काजाम’ आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सर्व पक्षीय खासदार, आमदार, नेते आणि हजारो लोक सहभागी झाले आहेत.
हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कोल्हापूर आणि सांगली पाटबंधारे मंडळाने अलमाट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीला ‘चक्काजाम’ आंदोलन मागे घेण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात 21 मे रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी या पत्राद्वारे अलमाट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीला बैठक घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे.