spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeइतिहासपलूसमध्ये 'कॉमन इंडियन ट्री फ्रॉग' प्रजातीचा दुर्मीळ पांढरा बेडूक

पलूसमध्ये ‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ प्रजातीचा दुर्मीळ पांढरा बेडूक

सांगली : प्रसारमाध्यम न्यूज

कृष्णाकाठी असलेल्या आमणापूर गावात एक दुर्मीळ व नजरेत न भरणारा पांढऱ्या रंगाचा बेडूक आढळून आला आहे. झाडांवर आणि भिंतीवर सहज चढणाऱ्या या बेडकाचे नाव ‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ असून, ही प्रजाती क्वचितच आढळून येते. विशेष म्हणजे हा बेडूक पहिल्यांदाच कृष्णाकाठी परिसरात पाहायला मिळाल्याने स्थानिकांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

नोंद सर्वप्रथम १८३० – 

या बेडकाची ओळख सर्वप्रथम १८३० साली ब्रिटिश निसर्ग अभ्यासक जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगासमोर आणली होती. नैसर्गिकरीत्या पांढऱ्या रंगाचा असणारा हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतो आणि स्वत:चे रक्षण करतो. त्याचे प्रमुख खाद्य कीटक आणि किडे असल्याने तो नैसर्गिक कीडनियंत्रणात मदत करणारा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मानला जातो.

या दुर्मीळ बेडकाचा शोध आमणापूर येथील छायाचित्रकार आनंदा राडे यांच्या स्टुडिओमध्ये लागला. भिंतीवर हा अनोखा बेडूक दिसून येताच त्यांनी त्याचे छायाचित्र घेतले आणि पर्यावरण अभ्यासकांशी संपर्क साधला. अभ्यासकांच्या मते, अशा प्रजातीचे बेडूक फक्त अतिवृष्टी होत असलेल्या भागातच आढळतात, त्यामुळे पलूस तालुक्यात अशा बेडकाचे दर्शन होणे ही पर्यावरणीयदृष्ट्या सकारात्मक बाब आहे.

आंबोली येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक काका भिसे – 

हा बेडूक स्थानिक पातळीवर दुर्मीळ असून, तो मुख्यतः झाडांवर किंवा भिंतीवर चढतो. अतिवृष्टी झाल्यावरच तो बाहेर पडतो. राडे यांनी हा बेडूक निसर्गातील त्याच्या मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बेडकाचे आगमन परिसरातील पर्यावरणीय संतुलन आणि जैवविविधतेसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. अशा दुर्मीळ प्रजातींचे निरीक्षण आणि संवर्धन करणे हे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.

———————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments