spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeकलाबदलत्या मनोरंजनाच्या संकल्पनेत बहुरूपी हरवत आहे आपल्या कलेचं अस्तित्व...

बदलत्या मनोरंजनाच्या संकल्पनेत बहुरूपी हरवत आहे आपल्या कलेचं अस्तित्व…

प्रसारमाध्यम अमोल शिंगे :

पोलीसांसारखा ढगळा पोशाख, हातात छडी, खांद्याला अडकलेली मळकट पिशवी आणि विनोदी शैलीत लोकांशी संवाद साधून आपला आणि आपल्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी गावोगावी फिरणारा बहुरूपी सध्या करमणुकीच्या बदलेल्या व्याख्येत कुठेतरी हरवत चाललेला दिसत आहे. बदलेली सामाजिक परिस्थिती आणि करमणूक क्षेत्राचे झालेले आधुनिकीकरण या परिस्थितीत जवळपास सर्वच लोककला विलुप्त होत चाललेल्या आहेत आणि याचबरोबर या लोककला सादर करणारे कलाकार देखील अनेक समस्येंच्या गर्तेत अडकत चालले आहेत. बहुरूपी ही एक लोककला याच परंपरेतील आहे. ही कला सादर करणारा बहुरूपी याच गर्तेत अडकलेला दिसत आहे.


बहुरूपी म्हटलं की समोर उभा राहतो तो पोलीसांचं रूप घेतलेलं एक विनोदी व्यक्तिमत.. पोलिसांचा वेष धारण करून गावागावात फिरणारा बहुरूपी आपण सर्वांनीच पाहिला आहे. “तुमच्या सासूबाईंची तक्रार आल्या आमच्याकडे म्हणून तुम्हाला अटक करायला बैलगाडी घेऊन आलोय” आशा पद्धतीचे विनोद करून लोकांना खळखळवून हसवणारा बहुरूपी सध्या फारसा कुठे दिसत नाही. टी व्ही, संगणक,इंटरनेट आणि मोबाईलच्या क्रांतीनंतर प्रामुख्याने ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन असणाऱ्या लोककला विलुप्त व्हायला सुरवात झाली तसा हा सर्रास दिसणारा बहुरूपीसुद्धा दिसेनासा झाला. जे काही वयोवृद्ध झालेले बहुरूपी आहेत ते ही लोककला टिकवण्यासाठी आणि आपलं पोट सांभाळण्यासाठी दारोदार फिरताना दिसत आहेत मात्र सध्या त्यांना पूर्वीसारखा समाजाकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पोलीस, शंकर, राम, हनुमान आशा देव देवतांची हुबेहूब सोंगं घेणारा बहुरूपी ही लोककला सोडून उदरनिर्वाहासाठी नोकरी, मजुरी करत आहेत. दिवाळी सणाच्यावेळी गावाबाहेर पालं मारून आपलं आपल्या कलेचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. पोट सांभाळण्यासाठी कला सोडून आपल्या मुलांना शिक्षण द्यावं म्हटलं तर तेवढी सक्षम आर्थिक परिस्थिती पण नाही आणि त्याच कलेला टिकवण्यासाठी प्रयत्न करावं म्हटलं तर समाजातून तसा प्रतिसाद पण मिळत नाही यामुळे या लोक कलाकाराची खूप मोठी विवंचना झाली आहे. मनोरंजनाच्या नवीन संकल्पना आणि बदलत्या व्याख्या हेच प्रमुख दोन घटक बहुरूपी आणि इतर लोककलांना बाधक ठरत आहेत. सध्या टी व्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट, मल्टीप्लेक्स, मॉल या आधुनिक आणि तंत्रज्ञानाने प्रगत झालेल्या करमणुकीच्या साधनांनी प्रेरित झालेली आत्ताची पिढी बहुरूपी या लोक कलाकाराची व्यथा ती काय समजणार!! असो हा बहुरूपी सगळी सोंगं घेण्यात पारंगत असला तरी त्याला पैशाचं सोंग काय घेता येत नाही आणि ही त्याच्या कलेतील एक उणीवच म्हणावी लागेल.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments