मार्च मध्ये घिबली स्टुडिओ आर्ट ट्रेंडमध्ये आला आणि चॅटजीपीटीनेही हा विक्रम केला.अ‍ॅप फिगर्सच्या अहवालानुसार, चॅटजीपीटी इमेज जनरेशन टूल लाँच झाले आहे. ज्यामध्ये घिबली स्टुडिओ आर्ट टूल जोडले गेले. तेव्हापासून ते डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.ओपनएआयद्वारे विकसित केलेले चॅटजीपीटी (ChatGPT) हे एआय-आधारित चॅटबॉट, माहिती देणे, प्रश्नांची उत्तरे देणे आणि सर्जनशील कार्ये यासाठी ओळखले जाते. आता चॅटजीपीटीने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. घिबली स्टुडिओ आर्ट टूल चॅटजीपीटीसाठी भाग्यवान ठरले. या टूलने चॅटजीपीटीला एक नवीन ओळख दिली. 

मार्चमध्ये इंस्टाग्राम आणि टिकटॉकनेही खूप चांगली कामगिरी केली. पण, चॅटजीपीटीकडून त्यांचा पराभव झाला. एकूण ४६ दशलक्ष उपकरणांवर चॅटजीपीटी डाउनलोड करण्यात आले, त्यापैकी १३ कोटी आयओएस आहेत आणि ३३ दशलक्ष अँड्रॉइड डिव्हाइसेसचा समावेश होता. याशिवाय, २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२५ च्या पहिल्या तिमाहीत डाउनलोड्समध्ये १४८ % वाढ झाली.

इंस्टाग्राम आणि टिकटॉक गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅप डाउनलोडच्या यादीत आघाडीवर होते. २०२४ मध्ये, इंस्टाग्रामने अनेकदा टिकटॉकला मागे टाकले, विशेषतः अमेरिकेतील तरुणांमध्ये. पाइपर सँडलरच्या सर्वेक्षणानुसार, ८७ % अमेरिकी किशोरवयीन मुले दरमहा इंस्टाग्राम वापरतात, तर टिकटॉक ७९ % आणि स्नॅपचॅट ७२ % वापरले जाते. आता चॅटजीपीटी या दोघांना टक्कर देत आहे. चॅटजीपीटीने भाषा समर्थन आणि आंतरराष्ट्रीय रोलआउट वाढवले, त्यानंतर विशेषतः भारतासारख्या बाजारपेठांमध्ये, जिथे डाउनलोड्समध्ये लक्षणीय वाढ झाली. भारत हा आता चॅटजीपीटीचा सर्वात वेगाने वाढणारा बाजार आहे.

चॅटजीपीटीच्या ब्रँड ओळखीमुळे इतर एआय चॅटबॉट्सना आव्हानाचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, Anthropic च्या Claude ला चॅटजीपीटीच्या तुलनेत कमी यश मिळाले आहे. दुसरीकडे, xAI च्या Grok ला एलन मस्क यांच्या प्रभावामुळे आणि X प्लॅटफॉर्मवरील प्रचारामुळे फायदा होऊ शकतो. मात्र, चॅटजीपीटीची बाजारातील आघाडी अजूनही अढळ आहे, कारण त्याचे नाव एआयशी जोडले गेले आहे. चॅटजीपीटीचा वापर वाढल्याने डिजिटल कंटेंटशी वापरकर्त्यांचा संवाद बदलत आहे. लोक आता केवळ सामग्री पाहत नाहीत, तर ती स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.