सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक; विद्यमान रश्मी शुक्ला ३ जानेवारी ला निवृत्त !

0
52

प्रसारमाध्यम : दिग्विजय माळकर

महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला येत्या ३ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. दाते यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल, असे गृहविभागाने स्पष्ट केले.

दाते १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. केंद्रीय समितीने दोन आठवड्यांपूर्वी मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे दाते यांची कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी  म्हणून ओळख आहे. 

दाते यांनी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दक्षतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पदही हाताळले आहे.दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या ‘फोर्सवन’ची जबाबदारी त्यांनी स्वत:हून मागून घेतली. फोर्सवनचे ते पहिले प्रमुख होते. मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. शहराच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन झालेले दहशतवाद विरोधी कक्ष आणि सोशल मीडिया सेल हे दाते यांच्या कल्पनेतूनच सुरू झाले होते. न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालू शकते ही कल्पनाही दाते यांनी प्रत्यक्षात आणली.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here