कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मागील बुधवारी व गुरुवार कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. असाच पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता मात्र हवामानात बदल झाल्याने शुक्रवार, शनिवार व रविवार पर्यंत पाऊस न पडता उन पडले होते. काल परत हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्र उत्सवांत पाऊस हलका ते मध्यम पडणार असा अंदाज केला आहे. आज सकाळ पासून ढग आहे.
यावर्षी राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी झाली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. जिथे अत्यल्प पाऊस होतो तेथे यावर्षी नद्या-नाल्यांना महापूर आला. परतीच्या पावसानेही अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला. मुंबईला तर या हंगामात तीन ते चारवेळा पावसाने चांगलेच झोडपले.
हवामान विभागाने विदर्भ प्रदेशासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, अहमदनगर, बीड, हातोळी, भंडारा, गडचिरोली, गोंडिया, वर्धा, यवतमाळ अशा जिल्ह्यांमध्ये संतप्त वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या विभागात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान पावसाची तिव्रता वाढेल असा अंदाज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १५ मे पासूनच पावसाने जोरदार ह्जेरी लावत सलग अडीच महिने एकसारखा पडत राहिला. सलग अडीच महिने पाऊस पडल्यानंतर परत पाऊस पडत आहे मात्र या पावसात तितकी ताकद राहिली नाही. जरी हवामान विभाग कोल्हापूर जिल्यात पावसाचा अंदाज करत असले तरी एखादा दिवस जोरदार पाऊस पडतो पण दुसऱ्या दिवशी खडखडीत उन पडते. असे चित्र आहे.